esakal | प्रवीण दरेकर यांनी दिलाय शिवसेनेला `हा` इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Praveen Darekar Warns ShivSena Ratnagiri Marathi News

विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनिकेत कानडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर, हेमंत भोसले, अविनाश माने, सुनील महाडिक, प्रवीण चव्हाण, सचिन चव्हाण यांचा समावेश आहे. 

प्रवीण दरेकर यांनी दिलाय शिवसेनेला `हा` इशारा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या हिंदूत्वाचा जाज्वल्य विचार केला होता. शिवसेनेने हिंदूत्वावर अनेक निवडणूकाही लढविल्या. पण सध्या सत्तेसाठी शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडलेला दिसतो. 80 टक्के समाजकारण करणाऱ्या शिवसेनेची सामाजिक बांधिलकीही लोप पावत असल्याचे चित्र कोविडच्या संकटात व कोकणच्या निसर्ग चक्रीवादळाच्या परिस्थितीत दिसून आले. त्यामुळे शिवसेनेची कोकणवासियांच्या प्रति निष्क्रीयता दिसून येत आहे. शिवसेनेला या निष्क्रियतेची राजकीय किंमत मोजावी लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खेड येथे दिला. 

खेड येथे भाजपच्या खेड तालुकाच्यावतीने आयोजित पदाधिकारी मेळाव्यात प्रवीण दरेकर बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष विनय नातू, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हा सरचिटणीस राजुभाई रेडीज, चिटणीस संजय बुटाला, जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, मंगेश मोहिते, खेड तालुका अध्यक्ष अनिल भोसले, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी शेलार, केदार साठे आदी उपस्थित होते. विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्या उपस्थितीत अनेक शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये अनिकेत कानडे, माजी उपनगराध्यक्ष वैभव खेडेकर, हेमंत भोसले, अविनाश माने, सुनील महाडिक, प्रवीण चव्हाण, सचिन चव्हाण यांचा समावेश आहे. 

श्री. दरेकर म्हणाले, शिवसेनेला हिंदुत्व व सामाजिक बांधिलकी या दोन गोष्टीमुळे वेगळा जनाधार प्राप्त झाला होता. परंतू या दोन्ही गोष्टींचा आता शिवसेनेला सोयीस्करित्या विसर पडल्यामुळे जनतेच्या मनात शिवसेनेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. कोविडच्या संकटात मुंबईकर चाकरमान्यांना एसटी सेवा पुरविण्यात शिवसेनेचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे सांगत कोकणच्या चाकरमान्यांच्या मनात शिवसेनेविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे दरेकरांनी सांगितले.  

संपादन - राजेंद्र कृष्णराव घोरपडे

 
 

loading image