
कोकणाला लाभलेल्या अलौकीक निसर्गसौंदर्यामध्ये ७२० किलोमिटीर लांबीच्या निळाशार समुद्र किनारपट्टीने भर घातली आहे. या किनारपट्टीवर पर्यटन, मासेमारी यासह आता कोळंबी संवर्धन प्रकल्पातून लाखो रूपयांची उलाढाल अन् रोजगारनिर्मितीही होत आहे. कमी कालावधीत जादा उत्पन्न मिळवून देणार्या कोळंबी शेतीसमोर विविध समस्या अन् आव्हाने आहेत. कोरोनानंतर हा उद्योग अडचणीत सापडलेला असतानाच अमेरिकेने केलेल्या शुल्कवाढीची भर पडली आहे. असा अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी शासनाकडून पाठबळाची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने कोळंबीशेतीला कृषीचा दर्जा देवून राज्यशासनाने टाकलेले एक पाऊल स्वागतार्ह आहे. या निर्णयाला अधिक बळ मिळण्याची अपेक्षा कोळंबी प्रकल्पधारक करीत आहेत.
- राजेंद्र बाईत, राजापूर