मंडणगड : मंडणगड तालुक्यातील कुडुकबुद्रुक येथील एका गर्भवती महिलेचा (Pregnant Woman) बाळासह मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. १० मे रोजी हा प्रकार घडला. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या (Health Department) कारभाराचा फटका या महिलेला बसल्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.