कथित धमकी नाट्य ; सभापतींना संरक्षण अन्‌ शुभेच्छा

present sabhapati in dabhol kokan to good luck and good wishesh in ratnagiri
present sabhapati in dabhol kokan to good luck and good wishesh in ratnagiri

दाभोळ : शिवसेनेशी सोयरीक केल्याच्या रागावरुन सभापती रउफ हजवानी यांना सभापती कक्षात बसू देणार नाही, अशी कथित धमकी दिल्यावर कोण आडकाठी करतो म्हणत काल शिवसेना कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या आणि लोकप्रतिनिधींनी सभापतींना सुरक्षा अन्‌ शुभेच्छाही दिल्या. बराच वेळ शिवसैनिक सभापतींच्या कक्षात बसून होते. सभापती आसनावर विराजमान झाल्यावर त्यांच्याशी चर्चा करून शिवसैनिक परतले.

हजवानी यांनी त्यांची सभापतिपदाची मुदत संपल्यावरही राजीनामा दिला नाही. त्यांना मुदतवाढ हवी होती, मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ती न दिल्यामुळे ते नाराज होते. योग्य वेळी राजीनामा देऊ, असे त्यांनी सांगितले. या पार्श्‍वभूमीवर त्यांना सभापती कक्षात बसू देणार नाही, अशी कथित धमकी दिल्याची चर्चा पंचायत समिती परिसरात सुरू होती, मात्र शुक्रवारी (२५) ते पंचायत समितीत आलेच नाहीत. आज नगराध्यक्षा, पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्या आदी सभापती कक्षात उपस्थित होत्या.

गेल्या तीन वर्षात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तसेच महिला पदाधिकाऱ्यांची एवढी गर्दी कधी राष्ट्रवादीच्या सभापतींच्या कक्षात आढळून आली नव्हती त्यामुळे आजचे हे चित्र काहीतरी वेगळेच असल्याचे दिसून आले. आज शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, प्रकाश कालेकर, गीतांजली वेदपाठक, मनोज भांबीड, रोहिणी दळवी यांनी हजवानी यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छाही दिल्या. 

"विकासकामांच्या चर्चेसाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिंधीनी आज माझी भेट घेतली. आमची चांगली चर्चाही झाली. त्यांनी मला शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवसेनेने मला संरक्षण दिले असा प्रकार नाही. समाजमाध्यमांवर माझी बदनामी करणाऱ्याविरोधात दापोली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे."

- रउफ हजवानी, सभापती

"चुकीचे काम करणाऱ्याचे मन नेहमी त्याला खात असते, अंतर्मनातून ते घाबरले असावेत म्हणून सभापती हजवानींनी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे संरक्षण घेतले असावे. माझ्यासह उपसभापती ममता शिंदे, संख्या पवार, युवराज जाधव असे चार जण सभापती कक्षातच बसलो. त्यामुळे सभापतींना धमकी देण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही." 

- मुजीब रुमाणे, राज्य पक्ष प्रवक्‍ते, राष्ट्रवादी काँग्रेस
 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com