राष्ट्रपतींच्या स्वागताला मंडणगड सज्ज...

प्रशासनाने कंबर कसली; सुविधा निर्मितीचे आव्हान पेलले; थोड्याच वेळात होणार आगमन
राष्ट्रपतींच्या स्वागताला मंडणगड सज्ज...
राष्ट्रपतींच्या स्वागताला मंडणगड सज्ज...sakal
Updated on

मंडणगड : महामहीम राष्ट्रपती डॉ.रामनाथ कोविंद यांच्या स्वागताला मंडणगड तालुका सज्ज झाला असून राष्ट्रपतींच्या महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गाव आंबडवे स्मारक भेट या ऐतिहासिक सुवर्णदिनाची तालुकावसियांमध्ये उत्कंठा वाढली आहे. सोयी सुविधांचा अभाव असणाऱ्या मंडणगडमध्ये राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलला अनुसरून व्यवस्था निर्माण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने यशस्वी पेलले आहे. तब्बल बावीस किमीचा रस्ता मार्गाने प्रवास करून राष्ट्रपती आंबडवे येथे येणार असून ही विशेष बाब महत्वपूर्ण आहे.

हेलिपॅड पासून बावीस किमीचा रस्ता सुरक्षित आणि सुस्थितीत आणण्यासाठी आठवड्यापासून प्रशासन रात्रंदिवस कार्यरत राहिले. प्रशासनातील उच्च श्रेणी अधिकारी, कर्मचारी, पोलीस, फोर्स दाखल झाले असून कार्यरत झाले आहेत. दोन दिवस सकाळी राष्ट्रपती ज्या मार्गाने जाणार आहेत त्या मार्गावर रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये येणाऱ्या अडथळे, समस्या या दूर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रपती सकाळी साडेदहा पर्यंत मंडणगड मधील शिरगाव येथील हेलिपॅड येथे दाखल होणार आहेत. त्यानंतर रस्ता मार्गाने आंबडवेकडे प्रयाण होणार आहे.

विश्व भूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे अभिवादन करून अस्थिकलश दर्शन घेणार आहेत. यावेळी बाबासाहेबांचे नातेवाईक, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर येथे सभा मंडपात स्वागत कार्यक्रम संपन्न होणार आहे. याठिकाणी राष्ट्रपती आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रपतींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून आंबडवे येथे परवानगी सुरक्षा पास मिळालेल्या व्यक्तींनी उपस्थिती लावली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आंबडवे येथील कार्यक्रम संपन्न होत आहे. आजचा दिवस ऐतिहासिक असून मंडणगड तालुका व आंबडवे गावाच्या इतिहासात सुवरणाक्षरांनी लिहीला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ratnagiri food safety raid on fake paneer
Mumbai Goa Highway landslide update
MNS threatens protest in Sudhagad Taluka against the installation of smart meters by Mahavitaran
ANS (Andhashraddha Nirmulan Samiti) and women's organizations in Pen organize 'Vatsavitri te Vatdharitri' campaign for tree plantation
Marathi News Esakal
www.esakal.com