

Election officials briefing the media on measures to curb money misuse during Zilla Parishad and Panchayat Samiti elections in Sawantwadi.
sakal
सावंतवाडी : तालुक्यातील ९ जिल्हा परिषद आणि १८ पंचायत समिती मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून, प्रशासनाने यादृष्टीने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी स्थिर पथके आणि विभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.