esakal | कारागृहातून पळालेला कैदी पेढेत जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

कारागृहातून पळालेला कैदी पेढेत जेरबंद

जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रत्नागिरीच्या खुल्या कारागृहातून पलायन करणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने सहा दिवसांनी पेढे येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले. तीन दिवस मेहनत घेऊन आज ही कारवाई केली.

कारागृहातून पळालेला कैदी पेढेत जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रत्नागिरीच्या खुल्या कारागृहातून पलायन करणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने सहा दिवसांनी  पेढे येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले. तीन दिवस मेहनत घेऊन आज ही कारवाई केली. रूपेश तुकाराम कुंभार (वय ३९, रा. वेळंब कुंभारवाडा, गुहागर) असे अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे.

खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. आरोपी यापूर्वी नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. २७ ऑक्‍टोबर २०१८ रोजी त्याला रत्नागिरीच्या खुल्या कारागृहात दाखल केले. तेथे शिक्षा भोगत असताना ११ जूनला त्याने तेथून पलायन केले. शिक्षा भोगणाऱ्या कुंभार याला यापूर्वी नातेवाईक येऊन भेटल्याची माहिती पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडून मिळविली होती. 

loading image