गोव्यातील खासगी बसेसना दोडामार्गात प्रवेश

गोव्यातील खासगी बसेसना दोडामार्गात प्रवेश
गोव्यातील खासगी बसेसना दोडामार्गात प्रवेशsakal
Updated on

दोडामार्ग : गोवा हद्दीवर थांबणाऱ्या खासगी प्रवासी बसेसना आजपासून दोडामार्ग हद्दीत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे गेले कित्येक महिने सुरु असलेली प्रवाशांची परवड आता थांबणार आहे. शिवसेनेचे तालुकप्रमुख बाबूराव धुरी यांनी आजपासून बसेसना दोडामार्गात प्रवेश न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिस आणि महसूल प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी खासगी बसेससाठी सीमा खुली केली.

गोव्यातील खासगी बसेसना दोडामार्गात प्रवेश
नवाब मलिकांवर कायदेशीर कारवाई करणार: समीर वानखेडे

कोरोनामुळे दोडामार्गमधून गोव्यात ये-जा करणाऱ्या बसेस बंद होत्या. व्यापारी, भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रवाशांचे हाल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्यांसाठी बसेस सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. प्रशासनाने मात्र गणेशोत्सवात बसेस बंदच ठेवल्या होत्या. अलिकडे गोव्यातून येणाऱ्या कदंबा बसेस तेवढ्या दोडामार्गमधील काही मार्गावर धावत होत्या. पण खासगी बसेस सुरु नसल्याने सीमेवर उतरून कुटुंब कबिला आणि समानासह लोकांना दोडामार्ग बस स्थानक अथवा बाजारपेठेत चालत जावे लागायचे. त्यात त्यांची दमछाक होत असे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने इतर वाहतुकीस शासनाने परवानगी दिली होती; मात्र खासगी बसेस गोवा हद्दीत थांबवण्यात येत होत्या. त्यांना महाराष्ट्र हद्दीत प्रवेश नव्हता. त्यामुळे दररोज गोव्यात कामाला जाणारे युवक युवती आणि अन्य प्रवाशांचे हाल होत होते.

त्यामुळे श्री. धुरी यांनी प्रशासनाला इशारा दिला होता.त्याची दखल घेत आज पासून गोवा प्रवासी बसेसना दोडामार्गमध्ये प्रवेश दिला. यावेळी पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, गोपाळ गवस, शैलेश दळवी, राजेंद्र निंबाळकर, भगवान गवस, गुरुदास सावंत, सुनील गवस, विशांत तळवडेकर, आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nitesh Rane BJP joining event Sindhudurg
Why Mumbai-Goa Highway work is delayed
Gopalgad Fort ownership dispute in Ratnagiri
Fishing boat trapped in creek Ratnagiri
Marathi News Esakal
www.esakal.com