
आपलं शरीरच झालंय कचऱ्याचे डस्टबीन असे म्हटले तर ती आता अतिशयोक्ती राहिली नाही. ते एक विदारक कटू सत्य आहे. सध्या प्लास्टिकने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे; पण त्याचे गांभीर्य नसल्याने किंवा प्लास्टिक कचऱ्यासंदर्भात जनजागृती कमी पडल्यामुळेच आज महाभयंकर अशा रोगांना आपलंसे करण्याची जणूकाही स्पर्धाच मानवी शरीरात लागल्याचे दुर्दैवी चित्र आहे. संपूर्ण पृथ्वीतलावर आणि मानवी आणि सजीव सृष्टीमध्ये आज प्लास्टिकसारख्या अविघटनशील कचऱ्याने थैमान घातले आहे. ही भयानकता किंबहुना याची सत्यता जाणून घ्यायलाही दुर्दैवाने कोणाकडे वेळ नाही. कचरा आणि पाणी या अति महत्त्वाच्या गोष्टींच्यावर साधा विचार करायला वेळ द्यायला किंवा वाचायलाही कोणाकडेच वेळ नाही असं म्हणणाऱ्यांसाठीच आपण "मला वेळ नाही" या गोष्टीकडे प्रथम लक्ष वेधून आजच्या लेखनातून वेळ मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- प्रशांत परांजपे, दापोली