esakal | कोकणात बीच शॅक, टेंटसह कॅराव्हॅन टुरीझमला चालना
sakal

बोलून बातमी शोधा

promotion of caravan tourism with tents beach shack in Konkan

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य यांनी ही बैठक घेतली. या वेळी कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी दिली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे या वेळी आदित्य यांनी सांगितले.

कोकणात बीच शॅक, टेंटसह कॅराव्हॅन टुरीझमला चालना

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - कोकणात बीच शॅक टुरीझम, टेंट टुरीझम, कॅराव्हॅन टुरीझम यासह कृषी पर्यटनालाही मोठ्या प्रमाणात वाव आहे. होम स्टेच्या माध्यमातून येथे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईपासून गोव्यापर्यंतच्या विविध पर्यटन ठिकाणांच्या विकासाचा आराखडा करून त्याला चालना देण्यात येईल. दर महिन्याला बैठक घेऊन कोकणचा पर्यटन विकास व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील बैठकीत सांगितले. 

कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य यांनी ही बैठक घेतली. या वेळी कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरणाला मंजुरी दिली आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल्स गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे या वेळी आदित्य यांनी सांगितले. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक धनंजय सावळकर, आमदार योगेश कदम, रत्नागिरी व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ऑनलाइन उपस्थित होते. 

मंत्री सामंत म्हणाले, कोकणातील सानेगुरुजी यांचे स्मारक, कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे स्मारक आदी कामांना मंजुरी देऊन त्यास गती देण्यात यावी. त्याचबरोबर कोकणासह राज्यातील किल्ल्यांच्या विकासाला चालना देण्यात यावी. दुबईच्या धर्तीवर कोकणात ग्लोबल व्हिलेजसारखा पर्यटन उपक्रम राबविता येऊ शकेल. 
 

loading image