
दाऊदची मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून मंगळवारी खरेदी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
चिपळूण : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव सुरू आहे. तालुक्यातील लोटे येथील दाऊदची मालमत्ता स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून मंगळवारी खरेदी केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. काते यांनी १ कोटी १० लाख इतक्या किमतीला मालमत्ता विकत घेतली आहे.
साफेमा तर्फे हा ऑनलाईन लिलाव आयोजित केला होता, जो रवींद्र काते यांनी जिंकला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या मालमत्तेची लिलावात किमान आधार पुरस्कार मूल्य १ कोटी ९ लाख १५ हजार ५०० रुपये होते. नोव्हेंबरमध्ये इतर सहा मालमत्तांसह ३० गुंठे जागेसह या मालमत्तेचा लिलाव काल मंगळवारी होणार होता. दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेसह इतर चार मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. त्यामध्ये इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेचाही समावेश आहे. यापूर्वी दाऊद इब्राहिमच्या सहा मालमत्तांचा लिलाव झाला होता. या मालमत्ता दिल्लीतील दोन वकिलांनी खरेदी केल्या आहेत.
हेही वाचा - रात्री चमकणाऱ्या लाटांचं सत्य काय, गुलाबी थंडीत रत्नागिरीतील आरे वारे समुद्रकिनारा का होतो निळाशार? -
१९९९ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांपासून दाऊद फरार होता. अंडरवर्ल्ड डॉनच्या मालमत्तांचा लिलाव करून सरकारने २२, ७९, ६०० रुपये कमावले आहेत. दाऊदची मालमत्ता विकत घेणार्या वकील अजय श्रीवास्तव यांनी दोन मालमत्ता विकत घेतल्या. त्याच वेळी, वकील भूपेंद्र भारद्वाज यांनी दाऊद इब्राहिमच्या चार मालमत्ता विकत घेतल्या, लिलाव प्रक्रिये दरम्यान, सरकारने दाऊदचा निकटवर्ती इक्बाल मिर्चीची मालमत्ता विक्री करण्याची बोलीही लावण्यात आली.
संपादन - स्नेहल कदम