कर्नाटक सरकार विरोधात कोकणात शिवप्रेमींतर्फे जोरदार घोषणाबाजी

Protest of Karnataka government in konkan sindhudurg
Protest of Karnataka government in konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवणाऱ्या कर्नाटक सरकारचा येथील शिवसेनेच्या वतीने निषेध व्यक्त करत कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. माजी पंचायत समिती सदस्य नारायण ऊर्फ बबन राणे यांनी मुंडन करत आगळावेगळा निषेध दर्शविला. 

बेळगाव जिल्ह्यातील मणगुत्ती गावात रातोरात महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. तेथील एका गटाने पुतळा बसविण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचा आरोप करत विरोध केला होता. त्यामुळे पुतळ्यावरून तेथे शिवप्रेमी आणि एका गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्‍वभूमीवर रातोरात तेथील पुतळा हटविण्यात आल्याने शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे.

त्याचे पडसाद महाराष्ट्र राज्यातही दिसुन येत असताना आज येथील शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध करताना येथील गवळीतिठा परिसरात मुख्यमंत्र्याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत ऊर्फ अण्णा केसरकर, शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणीयार, नगरसेविका भारती मोरे, महिला संघटक अपर्णा कोठावळे, रश्‍मी माळवदे, प्रशांत कोठावळे, महेश शिरोडकर, संजय माजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा देताना जे भाजप सरकार शिवाजी महाराजांच्या नावाने मते मिळवून सत्ता मिळतात तेच भाजपचे सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवतात. त्यामुळे अशा भाजप सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com