आता शिक्षण विभाग होणार हायटेक ; भविष्यनिर्वाह निधीची माहिती एका क्‍लिकवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

या शिक्षकांची सेवा पुस्तके तसेच भविष्यनिर्वाह निधी, पेंशन आदी काम बघताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग हायटेक बनत आहे. प्राथमिक शिक्षकांचा भविष्यनिर्वाह निधी आता ऑनलाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला. एका क्‍लिकवर शिक्षकांना ती माहिती पाहता येईल. जिल्ह्यातील सात हजार शिक्षकांना याचा लाभ मिळेल, अशी माहिती शिक्षण सभापती सुनील मोरे 
यांनी दिली.

हेही वाचा - गाळ ठरतोय गरम पाण्याच्या कुंडाचा काळ -

जिल्हा परिषदेत सर्वाधिक आस्थापना प्राथमिक शिक्षण विभागाची आहे. या शिक्षकांची सेवा पुस्तके तसेच भविष्यनिर्वाह निधी, पेंशन आदी काम बघताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शिक्षकांच्या अनेक समस्या असतात. त्या कमी करण्यासंदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. 

यात भविष्यनिर्वाह निधीची माहिती ऑनलाइन करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सात हजार शिक्षकांची माहिती ऑनलाइन करण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक शिक्षकाला एक कोड नंबर दिला जाणार आहे. तो जिल्हा परिषदेच्या संबंधित पोर्टलवर टाकल्यानंतर निधीचा तपशील शिक्षकांना पाहता येणार आहे. बहुतांशवेळी शिक्षकांना याची माहिती तपासण्यासाठी जिल्हा परिषदेत खेटे घालावे लागत होते. ते आता कमी होणार आहेत. याबाबत शिक्षकांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

सेवापुस्तके अद्ययावत

कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकांमध्ये वेळीच नोंदी न झाल्याने निवृत्तीवेळी पेन्शन व इतर वित्तीय लाभ देताना अनेक अडचणी येत आहेत. शिक्षकांची सेवापुस्तके विविध प्रकारच्या नोंदी वेळेत न घेतल्याने अद्ययावत नसतात. अध्यक्ष रोहन बने आणि शिक्षण सभापती सुनील मोरे यांनी सेवापुस्तके अपडेट करण्यासाठी पदभार स्वीकारल्यावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. ८० टक्‍के काम पूर्ण झाले.

शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष भाजपच्या वाटेवर -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: provident fund information on one click the department of education hightek in ratnagiri