पोर्तुगीज अहवालातील ''किल्ले'' पुस्तकाचे दादर येथे प्रकाशन

पोर्तुगीज अहवालातील ''किल्ले'' पुस्तकाचे दादर येथे प्रकाशन

87505

पोर्तुगीज अहवालातील ‘किल्ले’
पुस्तकाचे दादर येथे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ इतिहास संकलक आप्पा परब संकलित पोर्तुगीज अहवालातील ‘किल्ले’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे पार पडला. पुस्तकाचे प्रकाशन संकलक आप्पा परब, स्मारकाचे अध्यक्ष माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू रणजित सावरकर, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगडचे अध्यक्ष सुनील पवार, कार्याध्यक्ष सनी ताठेले, सचिव व पुस्तकाचे प्रकाशक समीर वारेकर, समिती सदस्य राजू देसाई, रंजन गावडे यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यासाठी समितीचे अनेक सदस्य व शिवभक्त उपस्थित होते.
पोर्तुगीज अंमलात कोकण किनारपट्टीवर शंभर-सव्वाशे किल्ले होते. या किल्ल्यांची पोर्तुगीज कागदपत्रांमध्ये असलेली माहिती आप्पा परब यांनी संकलित करून या पुस्तकांमध्ये मांडली आहे. दरम्यान, २० जूनला किल्ले रायगडावर श्री शिवराजाभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदा श्री शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. शिवचरित्राशी संबंधित असणारे उपक्रम समितीद्वारे साजरे करण्यात येत असतात. त्या अनुषंगाने पोर्तुगीज अहवालातील ‘किल्ले’ पुस्तक प्रकाशन सोहळा करण्यात आला, अशी माहिती अध्यक्ष पवार यांनी दिली. श्री शिवराजाभिषेक सोहळ्याला सर्व शिवभक्तांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com