झाडे सांगतात स्वत:ची माहिती...(व्हिडिओ)

दिनेश पिसाट
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने एक अभिनव उपक्रम राबवला असून 400 झाडांवर क्युआर कोड लावले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे मुंबई गोवा महामार्गालगत निसर्गाच्या सानिध्यात आहे.

रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाने एक अभिनव उपक्रम राबवला असून 400 झाडांवर क्युआर कोड लावले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे मुंबई गोवा महामार्गालगत निसर्गाच्या सानिध्यात आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात अनेक दुर्मिळ वनस्पती असल्याने या वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी या करिता 400 रोप आणि झाडांवर वनस्पती विभागाने नामफलक लावले आहेत, या फलकावर वनस्पतींचे शास्त्रीय नाव व स्थानिक नाव वनस्पतीची रचना, गुण धर्म, औषधी गुणधर्म, या फलकावर देणे कठीण असल्याने विद्यालयाने ह्या वर पर्याय शोधून त्या वनस्पतीची संपूर्ण माहिती क्युआर कोडच्या माध्यमातून फलकावर देण्यात आली आहे.

विद्यार्थी व अभ्यासक मोबाईल वर क्युआर कोड स्कॅन करून या वनस्पतीची संपूर्ण माहिती घेऊ शकतात हा उपक्रम जिल्ह्यात प्रथमच या महाविद्यालयाने केला असून संपूर्ण जिल्ह्यात असच उपक्रम राबविण्याचा मानस आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: QR code on 400 tree in raigad