esakal | दिलासादायक ! एसटी कामगारांचा `हा` प्रश्‍न सुटणार 
sakal

बोलून बातमी शोधा

The Question Of Salary Of ST Workers Solved Ratnagiri Marathi News

एसटी कामगारांच्या रखडलेल्या वेतनाबाबत श्री. पवारांनी माहिती घेतली. कामगारांच्या वाढत्या आर्थिक समस्येबाबत सखोल व वस्तुस्थिती श्री. शिंदे यांनी सांगितली. रखडलेल्या वेतनसंदर्भात पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी फोनवर तातडीने चर्चा केली.

दिलासादायक ! एसटी कामगारांचा `हा` प्रश्‍न सुटणार 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - एसटी कामगारांचा वेतन प्रश्‍न येत्या सोमवार, मंगळवारी सुटण्याची शक्‍यता आहे. या संदर्भात आज एकमेव मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांनी फोन करून परिवहन मंत्र्यांशी चर्चा केली. कामगारांच्या मागणीची दखल घेतली. 

एसटी कामगारांच्या रखडलेल्या वेतनाबाबत श्री. पवारांनी माहिती घेतली. कामगारांच्या वाढत्या आर्थिक समस्येबाबत सखोल व वस्तुस्थिती श्री. शिंदे यांनी सांगितली. रखडलेल्या वेतनसंदर्भात पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी फोनवर तातडीने चर्चा केली. सोमवार किंवा मंगळवारी बैठकीतून एसटी कामगारांचा वेतनाचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, असे पवार यांनी आश्‍वासित केल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. 

कोरोनामुळे उद्‌भवलेली स्थिती, एसटी बंदमुळे अडचणीत आलेले कामगार याबाबत गेले काही महिने महाराष्ट्र एसटी कामगार संघटना वारंवार महामंडळ, मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करत आहे. कामगारांची बिकट आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी अजित पवार यांनी विशेष लक्ष घालावे, एसटी महामंडळास दोन हजार कोटी आर्थिक साहाय्य करावे, यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने पत्र व्यवहार केला. एसटी सक्षमीकरणासाठी दोन हजार कोटीचे पॅकेज व महाराष्ट्राच्या या जीवनवाहिनीचे राज्य शासनात विलिनीकरण याबाबतचे निवेदन अजित पवार यांना देण्यात आले.