

Raigad Climate Action Plan
esakal
पाली : वातावरणीय बदलाचे संकट रोखण्यासाठी आणि शाश्वत पर्यावरणाची जपवणूक करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित करण्यात आलेले वातावरणीय बदलाचे ध्येय गाठण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथमच रायगड जिल्हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याची औपचारिक घोषणा जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा किशन जावळे यांनी केली. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो, असर सोशल इंपॅक्ट ॲडवायसर व वातावरण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे सोमवारी (ता. 19) व मंगळवारी (ता. 20)) आयोजित ‘नॅशनल सेमिनार ऑन लोकलायझिंग जेंडर क्लायमेट एक्शन’ कार्यक्रमात व्हीडिओद्वारे बोलत होते.