Raigad : अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली बल्लाळेश्वर च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बोलेरो जीपचा अपघात

पाली खोपोली महामार्गावर पेडली नजीक घडला अपघात
Raigad
Raigadsakal
Updated on

Raigad, पाली - कसारा येथून अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीतील बल्लाळेश्वर दर्शनासाठी जाणारी बोलेरो जीप शुक्रवारी (ता.23) पाली खोपोली राज्य महामार्गावर पेडली द्वारका हॉटेल नजीक पलटून अपघात झाला. या जीपमधून एकूण 10 प्रवाशी प्रवास करीत होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Raigad
Mumbai News : माणकोली ते कोपर उड्डाणपूल दरम्यान दुतर्फा वाहन उभी करण्यास मनाई; वाहनकोंडी होऊ नये म्हणून उपाययोजना

पाऊस पडत असल्याने चालकाचे वाहनावरचे नियंत्रण सुटले व बोलेरो जीप रस्त्याच्या खाली पलटी झाली. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रवाशांमध्ये संजय आरे (२३),भारती आरे (१९), सुनिल वारे (१९),योगेश धापटे (२०),सागर झुगरे (२१),ऐश्वर्या झुगरे (१९),प्रकाश घाटल (२५), प्रियंका घाटलं (२२),विशाल अवाटे (२२) आणि मिसेस अवाटे (२०) या प्रवाशांचा समावेश आहे. जखमींना पेडली येथील डॉ. सलील भिडे यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Raigad
Mumbai Crime News : मुंबई ते दिल्ली विमान हायजॅक करण्याची धमकी! हरियाणाच्या तरुणाला अटक

अपघाताची माहिती मिळताच अपघातग्रस्तांच्या मदतीला सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठीलकर, विजय भोसले, शाहिद शेख, अमोल कदम, भक्ती साठेलकर, पूजा साठेलकर,विशाल चव्हाण, विवेक रावळ, धर्मा पाटील, निलेश कुदळे, अनिल सावंत व शैलेश मांडवकर, आदींसह संपूर्ण टीम खोपोली तसेच पाली पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे व पोलीस व स्थानिक नागरिक घटनास्थळी तातडीने पोहचले व मदत कार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Built 18 Historic Wells In Shikhar Shingnapur To Be Conserved With Restoration Work Underway
Residents and devotees claim the temporary repair has increased the risk of accidents and made travel more difficult.
Historic Ballaleshwar Temple in Pali Waterlogged Amid Torrential Rainfall
Raigad
Marathi News Esakal
www.esakal.com