पाली - रायगड जिल्ह्यातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने किंवा आयोजकांनी पोलीस विभागाची पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करू नये, असे कडक आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. दोन महिन्यांसाठी रायगड जिल्ह्यामध्ये नो ड्रोन झोन लागू करण्यात आले आहे. ड्रोनचा गैरवापर रोखण्यासाठी देखील हा निर्णय घेण्यात आला आहे.