

Heavy Vehicle Ban Ahead of New Year Celebrations
Sakal
पाली : नाताळची सुट्टी व ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.