Raigad Rain
sakal
पाली - भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, जिल्ह्यात सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन ना. जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना मंगळवारी (ता. 7) सुट्टी जाहीर केली आहे. यापूर्वीही मुसळधार पावसामुळे सुट्टी देण्यात आली असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही सलग दुसऱ्या दिवशीची सुट्टी ठरली आहे.