
-अमित गवळे
पाली: मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोपून काढले आहे. या अतिवृष्टीमुळे सोमवारी (ता. 18) रात्री माणगाव तालुक्यातील खांदाड आदिवासीवाडी पाण्याने वेढली गेली. स्थानिक प्रशासन, पोलीस व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने या पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 नागरिकांची सुखरूप सुटका केली. मंगळवारी (ता. 19) पहाटे 3 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.