Breach of Fort Sanctity: The 'UNESCO Heritage' Violation Matrix
ESakal
महाड : रायगड किल्ल्यावर सहा जूनला पार पडलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात सहभागी झालेल्या शिवप्रेमींच्या नैसर्गिक विधीचे चित्रीकरण करून ते समाज माध्यमांवर प्रसारित करणाऱ्या लौकिक गोळे यांच्या विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी गुन्हा दाखल करण्याबाबतचे निवेदन पोलीस उपाधीक्षक शंकर काळे यांना आज महाड मध्ये दिले होते. त्यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.