
अलिबाग, ता. १७ : मंत्रिपद कोणत्याही खात्याचे द्या; पण रायगडचे पालकमंत्री करा, अशी भूमिका भरत गोगावले यांनी घेतल्याचे दिसत असतानाच राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्याने रायगडचे पालकमंत्री कोण होणार, असा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.
आदिती तटकरे यांनी कोरोना, निसर्ग चक्रीवादळासारख्या कठीण प्रसंगी रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती, त्यामुळे आदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रिपद राहावे, अशी अनेक नागरिकांची सुप्त इच्छा आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत पुन्हा शीतयुद्ध होण्याची शक्यता आहे.