Raigad Sports: रायगडच्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसाठी ‘खेले इंडिया’ निधीची खासदार तटकरे यांची मागणी

रायगडमधील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत खेळाडूंना बहुउद्देशीय इनडोअर हॉल, सिंथेटिक ट्रॅक, आधुनिक मैदाने व वसतिगृहे उभारून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी ‘खेले इंडिया’ निधीची मागणी
Sunil Tatkare seeks Khelo India funding for international standard sports infrastructure in Raigad

Sunil Tatkare seeks Khelo India funding for international standard sports infrastructure in Raigad

Sakal

Updated on

पाली : रायगड लोकसभा मतदारसंघातील क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि स्थानिक गुणवंत खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी 'खेले इंडिया' योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी (ता. 27) नवी दिल्ली येथे केंद्रीय युवा विकास व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेऊन सविस्तर प्रस्तावासह निवेदन सादर केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com