

All India Panther Sena demanded priority employment for Bahujan and local youth in Raigad industries, MIDC, logistics, and tourism sectors.
Sakal
पाली : पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यातील बहुजन व स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष संदेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. 2) जिल्हाधिकारी किशन जावळे व पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांना निवेदन देण्यात आले. पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देऊन प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.