

पाली, मगरीच्या यशस्वी रेस्क्यू मोहिमेत सहभागी वनविभागाचे अधिकारी आणि रेस्क्यू टीम. (छायाचित्र, अमित गवळे)
sakal
पाली : माणगाव तालुक्यातील पहेल गावातील सार्वजनिक तलावात गेल्या चार वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मगरीला अखेर सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले आहे. तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असल्याने आणि पाणी कमी झाल्याने मगरीच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, या उद्देशाने ही मोहीम बुधवारी (ता. 25) राबवण्यात आली.