

New Year Resolution Promotes Addiction-Free Life in Pali
Sakal
पाली : थर्टी फर्स्ट म्हटलं की आपल्याला बऱ्याचदा हातात दारूचा ग्लास व डीजेच्या तालावर डोलणारी तरुणाई व नागरिक दिसतात. मात्र पालीत बुधवारी (ता. 31) नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयुष्य व्यसनमुक्ती केंद्र अध्यक्ष व भाजप सुधागड तालुका युवा मोर्चा सरचिटणीस अंकुश आपटे यांच्यातर्फे तब्बल साडेतीनशे लिटर दुधाचे मोफत वाटप करून प्रबोधन करण्यात आले. त्यामुळे शेकडो लोक दारू ऐवजी दूध प्यायले. \ पाली नगरपंचायत कार्यालयाच्या जवळली प्रांगणात संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान मोफत दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांसह तब्बल सातशे लोकांनी उपस्थिती नोंदवली.