Raigad : पारमाची गावातील घरांना तडे; मूलभूत सोयी-सुविधांअभावी पुनर्वसन रखडले

१९९४ मध्ये तेरा जणांचा बळी
Raigad
RaigadSakal

महाड - भूगर्भशास्त्र विभागाच्या धोकादायक गावांच्या यादीत असलेले आणि १९९४ मध्ये महाड तालुक्यात पहिल्यांदाच दरड कोसळून १३ जण दगावलेले पारमाची गाव आजही धोकादायक स्थितीत आहे.

काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या गावातील घरांना तडे गेल्याने ग्रामस्थ पुन्हा भयभीत झाले असून त्‍यांचे सुरक्षित स्थळी तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे.

Raigad
Mumbai News : विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी एआय तंत्रज्ञान वापरणार

महाड-पुणे मार्गावर वरंध घाटाजवळ पारमाची हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. २८ जून १९९४ ला सायंकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरातून मातीचा मोठा भराव गावावर पडला आणि अनेक घरे उद्‌ध्वस्‍त झाली. या वेळी १३ जणांचा मृत्‍यू झाला होता. आजही पावसाळ्यात ग्रामस्थांना भीतीमुळे झोप येत नाही.

भूगर्भशास्त्र विभागाने हा परिसर दरडप्रवण म्हणून घोषित केला आहे. मुसळधार पावसामुळे परिसर धोकादायक बनला असून दोन दिवसांपूर्वी पारमाची गावातील चार ते पाच घरांना तसेच सभागृहालाही तडे गेल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले तर काही घरांमधील जमीन फुगल्याचे व जमिनीतून पाणी झिरपत असल्‍याचे दिसून आल्‍याचे ग्रामस्‍थ दत्ता पवार यांनी सांगितले.

याबाबत माहिती मिळताच तहसीलदार महेश शितोळे यांनी त्वरित गावाला भेट देत ज्‍या घरांना तडे गेले आहेत, तेथील कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे.

पुनर्वसन रखडले

पारमाची गाव आणि बौद्धवाडी अशी मिळून सुमारे १२७ घरे याठिकाणी आहेत.१९९४ च्या दरडीनंतर गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला. सरकारने पारमाची गावापासून दीड किमी अंतरावर सुनेभाऊ गावाजवळ ३० गुंठे जागा संपादित केली, यात प्लॉट पाडण्यात आले आहेत.

Raigad
Mumbai News : टॅक्सीत विसरलेला लाखांचा ऐवज महिलेला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश

मात्र याठिकाणी मूलभूत सोयीसुविधा देण्याबाबत काहीच उपाययोजना केल्‍या नाहीत. पाणी, वीज आणि रस्ता या तीन मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे गावापासून लांब जाऊन त्‍याठिकाणी पाणी नसेल तर करायचे काय, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ग्रामस्थ धोकादायक स्थितीत राहतात. पारमाची गावाजवळ तीस गुंठे जागा पुनर्वसनासाठी आरक्षित आहे, मात्र याठिकाणी पाणी, वीज, आणि रस्ता या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्याने अद्याप पारमाची गावाचे पुनर्वसन झालेले नाही.

- सुभाष मालुसरे, माजी सरपंच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com