Raigad Politics : उत्‍सवात मतदारांवर छाप पाडण्याची चढाओढ

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण मंत्रिपद मिळाले आहे.
aditi, sunil tatkare
aditi, sunil tatkare sakal

श्रीवर्धन - म्हसळा तालुक्यातील पक्षांतर्गत गटबाजीमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहेत. दोन्ही तालुके दशकभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिले आहेत; मात्र काही दिवसांपासून तालुक्‍यांत सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले असून मतदारांना आपली छाप पाडण्यासाठी चढाओढ सुरू आहे.

श्रीवर्धन तालुक्यात भरडखोल, हरवीत, बागमांडला, गाणी, दांडगूरी, खारगाव, वावे तर्फे श्रीवर्धन आणि वाकलघर या आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. यापैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तर म्हसळा तालुक्यात जांभूळ, कोळवट, भेकऱ्याचा कोंड, घुम, नेवरूळ, कुडगाव, ठाकरोली, आडी, साळवींडे, पांगलोली आणि वारळ या बारा ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असे प्रमुख पक्ष मतदारांना पर्याय होते, मात्र यावेळेस शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे प्रत्‍येकी दोन गटांचा पर्याय असले तरी इंडिया आघाडीच्या माध्यमातून मतदारांमधील संभ्रम काहीसा कमी होण्याची शक्‍यता आहे.

श्रीवर्धन, म्हसळा तालुका राष्ट्रवादीच्या ताब्‍यात असल्‍याचे मानले जाते, मात्र सध्याच्या राजकीय घटनांमुळे सर्वच पक्षांचे उमेदवार गुडग्याला बाशिंग बांधून बसले असून छुप्या प्रचारावर भर दिला जात आहे. म्हसळा, श्रीवर्धनमध्ये बहुसंख्य मुस्लिम मतदार आहे. शेतकरी कामगार पक्ष, महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिंदे गट, भाजप व इंडिया आघाडी यांच्या भूमिकांमुळे मुस्लिम मतदार कुणाला कौल देतात, हे आगामी काळात कळेल.

aditi, sunil tatkare
Raigad News : वाचन प्रेरणा दिन विशेष; फुल पुष्पगुच्छ ऐवजी पुस्तकांची भेट

मंत्रिपदामुळे वजन

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेलेल्या श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अदिती तटकरे यांना महिला व बालकल्याण मंत्रिपद मिळाले आहे. याचा फायदा घेत त्यांनी गेल्‍या काही दिवसांत जुन्या तसेच नवीन विविध कामांना गती दिली आहे. आमदार अदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून प्रत्येक गावांत भरपूर कामे झाल्याचे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दर्शन विचारे यांनी सांगितले.

‘इंडिया’ची बैठक पुढे ढकलली

सोमवारी (ता. १६) इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठकीचे नियोजन करण्यात आले होते, मात्र ती पुढे ढकलण्यात आली आहे. यात शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार व शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार होती. त्यांच्या एकत्रित बैठकीमुळे तटकरे विरोधी गटाला फायदा होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

aditi, sunil tatkare
Kokan Rain Update : गुहागरला झोडपले; पत्रे पडून आईसह दोन मुले जखमी

कार्यकर्त्यांची कोंडी

राष्ट्रवादीचा अजित पवार गट सरकारमध्ये सामील झाल्‍यावर खासदार तटकरे यांची कन्या श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अदिती तटकरे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. मात्र सरकारमध्ये सामील झाल्‍याने कित्येक वर्षे तटकरे यांच्याविरोधात असणाऱ्या शेकाप, शिंदे गटाच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडीझाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com