

RTI Information Withheld by Rasal Gram Panchayat
Sakal
पाली : सुधागड तालुक्यातील रासळ ग्रुप ग्रामपंचायतमध्ये माहितीच्या अधिकारांतर्गत (RTI) मागवलेली माहिती वेळेत न मिळाल्याने आता हा वाद चिघळला आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामसभा, मासिक सभांचे इतिवृत्त आणि बँक स्टेटमेंटची माहिती न दिल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी आता पंचायत समिती स्तरावर मंगळवारी (ता. 20) प्रथम अपील सुनावणी होणार असून, ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहेत.