The kitchen of a Zilla Parishad school in Pali, Raigad, where delayed honorarium and shortages of food supplies are affecting the midday meal scheme.
esakal
पाली: एकीकडे राज्य शासन शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेत दररोज नवनवीन पदार्थ समाविष्ट करून विविध प्रयोग करत असल्याचे भासवत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष परिस्थिती अत्यंत भीषण असल्याचे समोर आले आहे. रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांसाठी कष्टपूर्वक भोजन शिजवणाऱ्या स्वयंपाकी महिलांना शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून म्हणजे जून महिन्यापासून तब्बल पाच महिन्यांचे मानधन मिळालेले नाही.
जेमतेम अडीच हजार रुपये महिन्याच्या अत्यल्प मानधनावर काम करणाऱ्या या महिलांची गैरसोय होत आहे. परिणामी शिक्षकांसह स्वयंपाकी महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.