

Farmers Focus on Organic Farming and Drip Irrigation
esakal
पाली : हिवाळ्याची सुरुवात झाली असून जिल्ह्यात अनेक भागांत भात कापणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. यानंतर लगेचच रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कलिंगड लागवडीसाठी लगबग सुरू झाली आहे. कमी कालावधीत चांगला परतावा देणारे हक्काचे नगदी पीक म्हणून कलिंगड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. सध्या शेतांची मशागत, बेड तयार करणे आणि सिंचनाच्या नियोजनाला वेग आला आहे.