Raigad Zilla Parishad Yogesh Bhasme ₹1.5 lakh bribe
esakal
रायगड : तक्रारदाराच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सहाय्यक तथा जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील वित्त लेखा सहाय्यक योगेश प्रकाश भस्मे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) रायगड पथकाने बुधवारी (२३ सप्टेंबर) सायंकाळी रंगेहाथ पकडल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.