esakal | सावधान! यंदाही आंबोली पर्यटनाला जाणार असाल तर होणार कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान! यंदाही आंबोली पर्यटनाला जाणार असाल तर होणार कारवाई

सावधान! यंदाही आंबोली पर्यटनाला जाणार असाल तर होणार कारवाई

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सावंतवाडी : मान्सूनच्या पावसाची जोरदार सुरुवात झाली असून आंबोली वर्षा पर्यटन पर्यटकांना खुणावत आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्याने आंबोली कृती समितीकडून काही कठोर निर्बंध घालत पर्यटनला बंदी घातली आहे. यामुळे आंबोली धबधब्यावर येणाऱ्या पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई होत आहे.

महाराष्ट्रातील थंड हवेचे म्हणून आंबोली ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दरवर्षी मुंबई, गोवा, कोल्हापूर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा पर्यटनासाठी हजेरी लावतात. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळे हे पर्यटन बंद आहे. पावसाच्या दिवसात येथील मुख्य धबधब्यापाशी अनेक दुकानेही उभारली जातात. यातून दिवसागणिक चांगली उलाढाल होते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून नैसार्गिक आपत्ती आणि कोरोनामुळे येथील पर्यटन ठप्प झाले आहे. परिणामी येथील व्यावसायिकांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा: राज्याचे दोन मंत्री मराठा आंदोलनात सहभागी होणार - अजित पवार

पर्यटन बंद असल्याने व्यवसायासाठी घेतलेले कर्ज फेडायचे कसे असा प्रश्न व्यवसायिकांसमोर आहे. यंदा तरी कोरोना संसर्ग आटोक्यात येऊन पर्यटन व्यवसाय सुरळीत होईल, अशी आशा होती. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यावर निर्णय घेण्यासाठी आंबोली कृती समितीची बैठक झाली. यात आंबोलीत पर्यटकांमुळे कोरोनचा संसर्ग वाढू नये यासाठी पर्यटकांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. कारवाईसाठी पोलिस प्रशासनालाही निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार पोलिसांकडून धबधबा आणि वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येत आहे.

loading image
go to top