सावडाव धबधबा प्रवाहीत; पर्यटकांची हजेरी (व्हिडिओ)

अनंत पाताडे
शुक्रवार, 28 जून 2019

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. दरम्यान खारेपाटण येथे काल रात्री जोराचा पाऊस कोसळला. यामध्ये कोष्टेवाडी झगडे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले

कणकवली - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून रात्रभर संततधार कोसळत आहे. यामुळे ओढे-नाले प्रवाहित झाले आहेत. सावडाव धबधबाही पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. 

आंबोलीनंतर उत्तर कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटक सावडाव धबधबा पाहण्यासाठी येथे गर्दी करतात. 25 ते 30 फुटावरून हा धबधबा कोसळतो. हा धबधबा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित मानला जातो. यामुळे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटक गर्दी करतात. 

आम्ही कर्नाटकातून येथे धबधबा पाहण्यासाठी आलो आहोत. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आम्ही आलो आहोत. कर्नाटकापेक्षा कोकणातील साैदर्य पाहण्यासारखे आहे. येथील धबधबे नेहमीच बेळगावकरांना आकर्षित करतात. 
- संजय पाटील,
बेळगाव

खारेपाटण येथे घरावर कोसळले झाड

खारेपाटण येथे काल रात्री जोराचा पाऊस कोसळला. यामध्ये कोष्टेवाडी झगडे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळले. घरावर पडलेल्या झाडामुळे वित्त हानी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

जिल्ह्यातील पाऊस

दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू असून मालवण तालुक्यात सर्वाधिक 181 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 100.27 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला  असून 1 जून 2019 पासून आता पर्यंत 504.83  मि.मी. सरासरी एकूण पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय चोवीस तासात झालेला पाऊस

कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाची आहे. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 116 (554), सावंतवाडी 54 (257), वेंगुर्ला 150.2 (626.64), कुडाळ 110 (459), मालवण 181 (693), कणकवली 42 (486), देवगड 119 (502), वैभववाडी 30 (461) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rains in Sindhudurg