Rajapur Kodavali new dam seven times water storage
esakal
राजापूर : राजापूर शहराचा मुख्य जलस्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या खालील बाजूला नवीन धरणाची उभारणी सुरू (Rajapur Kodavali Dam) आहे. नव्या धरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. नव्या धरणामध्ये सद्यःस्थितीच्या सुमारे सातपट पाणीसाठा होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्यातून शहरातील पाण्याची क्षमता अधिक मजबूत होणार आहे. ही पाणीक्षमता राजापूर शहराचे भविष्यातील विस्तारीकरण अन् विकासाला अधिक गतिदायक ठरणार आहे.