राजापूर: देखण्या निसर्गसौंदर्याची कोकणाला दैवी देणगी लाभली असून, त्याचा वारसा राजापूर तालुक्यालाही लाभला आहे. सह्याद्री ते समुद्रकिनारा अशा विस्तारलेल्या राजापूरमध्ये पर्यटकांच्या नजरा खिळवून ठेवणारे निसर्गसौंदर्य, वैशिष्ट्यपूर्ण परिसर, प्रसिद्ध मंदिरे, धार्मिक ठिकाणे, तीर्थक्षेत्र आणि कातळखोद चित्र, गडकिल्ले, स्वच्छ आणि सुंदर निळाशार सागरी किनारपट्टी, नानाविविध पशु-पक्षी, प्राचीन धार्मिक स्थळे, सूर्यमंदिर, चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले जुवे बेट अशी कोकण आणि पश्चिम घाटातील वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतता या ठिकाणी पाहायला मिळते.