हुल्लडबाजी पडू शकते महागात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

राजापूर - सवतकडा धबधब्याच्या येथे दोन पोलिस तैनात केल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली. पोलिसांसह ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना पर्यटकांची हुल्लडबाजी, बिनदिक्कतपणे केले जात असलेले मद्यपान रोखण्याचे आव्हान आहे.  

कोल्हापूर परिसरातील पर्यटकांना वाचविण्याची घटना चुनाकोळवण येथे घडली. या बाका प्रसंगाची तत्काळ दखल जिल्हा प्रशासनाने घेत अशा धोक्‍याच्या ठिकाणी पोलिस यंत्रणा तैनात करण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे धबधब्याच्या ठिकाणी दोन पोलिस तैनात आहेत. गेल्या काही वर्षामध्ये सवतकडाकडे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामध्ये यावर्षी भर पडली. 

धबधब्याचे पाणी खाली पडते त्या डोहाच्या ठिकाणी पर्यटक अनेक वेळा हुल्लडबाजी करतात. डोहामध्ये जाणारी वाट निमुळती आणि घसरडी आहे. तेथून जा-ये करतानाही हुल्लडबाजी महागात पडते. पर्यटक तेथेच मद्यपान करतात. त्यातून भविष्यामध्ये अपघात वा बाका प्रसंग निर्माण होण्याची शक्‍यता ध्यानी घेऊन हुल्लडबाजी,मद्यपान रोखण्यासाठी पाऊले उचलली आहेत.

Web Title: rajapur news savatkada waterfall