राजसत्ता विठ्ठलादेवीचा कुंदेत वर्धापन सोहळा

राजसत्ता विठ्ठलादेवीचा कुंदेत वर्धापन सोहळा

swt167.jpg
84014
श्री राजसत्ता विठ्ठलादेवी

राजसत्ता विठ्ठलादेवीचा
कुंदेत वर्धापन सोहळा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १६ः कुंदे (ता. कुडाळ) येथील आदिशक्तीस्वरुपा श्री राजसत्ता विठ्ठलादेवीचा सोळावा वर्धापन दिन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. या सोहळ्यानिमित्त सकाळी श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, श्रींची महापूजा, महाआरती, महाप्रसाद, महिलांचे हळदीकुंकू आदी कार्यक्रम झाले. देवीची ओटी भरणे, नवस बोलणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम करण्यात आले. सायंकाळी गावातील स्थानिकांचा भजनांचा कार्यक्रम झाला. रात्री आजगावकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. या धार्मिक कार्यक्रमांना भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com