-नीट परीक्षेत राजश्री मानेचे उत्तुंग यश

-नीट परीक्षेत राजश्री मानेचे उत्तुंग यश

-rat८p२४.jpg-
P२४M८८८०३
चिपळूण ः राजश्री माने हिचा सत्कार करताना डॉ. मीनल ओक, कार्याध्यक्ष सई वरवाटकर, कार्यवाह प्रशांत देवळेकर आदी.
-------------

नीट परीक्षेत राजश्री मानेचे यश

चिपळूण, ता. ८ ः श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या आनंदराव पवार महाविद्यालयाची विद्यार्थिनी राजश्री प्रफुल्लचंद्र माने हिने मेडिकलसाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये तिने ७२० पैकी ७०० गुण मिळवून उत्तुंग असे यश मिळवले आहे.
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त डॉ. मीनल ओक, कार्याध्यक्षा सई वरवाटकर, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, महाविद्यालयाचे प्राचार्य भाऊ कांबळे आदींनी तिचा आणि पालकांचा सत्कार केला. डॉ. मीनल ओक यांनी यशाची खरी मानकरी ही राजश्रीच आहे. बाकी सर्वांनी तिला मार्गदर्शन केले. राजश्री आणि तिच्या वडिलांनी मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी संस्थेने केलेले सहकार्य, प्राध्यापकांनी केलेले मार्गदर्शन याचाही उल्लेख केला. राजश्री हिने सर्व प्राध्यापकांनी मला कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करावा, कोणती पुस्तके वाचावीत याचे बहुमूल्य मार्गदर्शन केल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com