esakal | रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbhaja Important In Agro Tourism Dr Sanjay Sawant Comment

डॉ. बाळकृष्ण गावडे आणि डॉ. निलेश कोदे यांनी लिहिलेल्या "रानभाज्या' पुस्तकाचे प्रकाशन झाले. याचे आयोजन स्नेहसिंधु कृषी पदवीधर शिक्षक संस्थेच्यावतीने केले होते. झुम ऍपच्या माध्यमातून "रानभाज्या' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व ः डॉ. संजय सांवत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

वैभववाडी ( सिंधुदुर्ग) - रानावनात, जंगलामध्ये असलेल्या रानभाज्यांना कृषी पर्यटनात अन्यन्य साधारण महत्व प्राप्त होणार आहे. या भाज्यांची माहिती स्थानिक तरूणांना असणे गरजेचे आहे. पर्यटकांना रानभाज्या आणि त्याचे औषधी गुणधर्म ज्ञात होण्यासाठी त्यासंदर्भातील साहित्य वेंगुर्ले फळसंशोधन केंद्रात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मत डॉ. बाळासाहेब सांवत कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय सांवत यांनी येथे व्यक्त केले. 

डॉ. बाळकृष्ण गावडे आणि डॉ. निलेश कोदे यांनी लिहिलेल्या "रानभाज्या' पुस्तकाचे प्रकाशन झाले. याचे आयोजन स्नेहसिंधु कृषी पदवीधर शिक्षक संस्थेच्यावतीने केले होते. झुम ऍपच्या माध्यमातून "रानभाज्या' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. संजय भावे, राज्य मराठी विकास संस्थेचे संजय पाटील, विभागीय सहसंचालक विकास पाटील, स्नेहसिंधुचे हेमंत सांवत, संदीप राणे, व्ही. के. सावंत, डॉ. संजय माने उपस्थित होते. 

कुलगुरू सावंत म्हणाले, ""कोकणातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात रानभाज्या आहे; परंतु त्याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे ही माहिती स्थानिक तरूणांना असणे आवश्‍यक आहे. कृषी पर्यटनासाठी रानभाज्यांचा प्रसार होणे आवश्‍यक आहे. पर्यटकांना या भागात कुठे आणि कोणत्या रानभाज्या मिळतात याची माहिती मिळणे गरजेचे आहे. याशिवाय पर्यटकांना रानभाज्याचे पदार्थही उपलब्ध होणे गरजेचे आहेत. त्यासाठी वेंगुर्ले संशोधन केंद्रात लवकरच त्यासंदर्भातील साहित्य ठेवण्यात येईल.'' 

दापोली कृषी विद्यापीठाचे डॉ. संजय भावे म्हणाले, "" रानभाज्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून स्नेहसिंधुने पुढाकार घेवुन मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणालगत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी अशा दोन ठिकाणी रानभाज्यांचे डेमोस्टेशन करावे.'' विभागीय सहसंचालक विकास पाटील यांनी रानभाज्यांचा आहारातील महत्व, औषधी गुणधर्म हे लोकांना समजणे गरजेचे आहे. रानभाज्यांच्या बियाण्यांची बॅंक निर्माण करता येते का? याचा विचार सुध्दा व्हावा, असे त्यांनी स्पष्ट केले. 

संकेतस्थळावरही माहिती 
रानभाज्यांचे पुस्तक प्रकाशीत करण्यासाठी राज्य मराठी विकास परिषदेने सहकार्य केले आहे; परंतु सध्याचे युग हे संगणकीय इंटरनेटचे आहे. त्यामुळे रानभाज्याचे हे पुस्तक मराठी भाषा परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


""रानभाज्या या पुस्तकात एकुण 350 रानभाज्यांचा समावेश आहे. वनस्पतीचे शास्त्रीय नाव, मराठी उच्चारण, स्थानिक नाव, संस्कृत नाव, त्या वनस्पतीच्या फुलांचे, फळाचे फोटो आणि वर्णन, पौष्टीक घटक टिकून राहण्यासाठी पांरपांरिक रेसीपी याची मांडणी केलेली आहे. डॉ.निलेश कोदे यांनी आयुर्वेदात भाज्याचे किती महत्वपूर्व यांनी मांडणी विविध ग्रथांचे दाखले देऊन केली आहे.'' 
- डॉ. बाळकृष्ण गावडे, लेखक, रानभाज्या 
 

 
 

loading image
go to top