शिक्षणासाठी रंजनाचा सुरू आहे असा प्रवास ; हा संघर्ष नक्कीच अनेक युवतींना प्रेरणादायी आहे

प्रमोद हर्डीकर
गुरुवार, 2 जुलै 2020

अडीच तास चालत जावे लागते शाळेत
रंजना कोळापटे साखरपा पुर्‍ये धनगरवाडीत राहणारी मुलगी

 

साडवली (रत्नागिरी) : गावाकडे येण्यासाठी धड रस्ता नाही एसटीचा तर पत्ताच नाही अशा स्थितीत रोज तब्बल अडीच तास पायी प्रवास करून साखरपा पुर्‍ये धनगरवाडीत राहणारी रंजना कोळापटे दररोज  शिक्षण घेत आहे.साविञीच्या लेकींचा शिक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष रंजनाच्या प्रवासातून पुढे येतो.

 
साखरपा कोंडगाव येथुन जवळच असलेले पुर्‍ये गाव व तेथील धनगरवाड्यात राहणारी रंजना सहा कि.मी.दुर असलेल्या आबासाहेब सावंत महाविद्यालयात १२ वी काॅमर्सचे शिक्षण घेते. ही मुलगी काॅलेजसाठी दररोज अडीच तास चालत शिक्षणासाठी पोहचत आहे.या गावात जाणार्‍या काजळीनदीवरील पुल हा अरुंद असल्याने या भागात एस.टी.ची सुविधा नाही.खाजगी वाहनाने जाण्याची रंजनाची परिस्थिती नाही.मुलींना एस.टी.सेवा मोफत असली तरी तीचा फायदा हिला घेता येत नाही.

हेही वाचा - ब्रेकिंग -  जेलमधील 10 जणांना कोरोनाची लागण...

काॅलेज सकाळचे असले तर रंजनाला पहाटे पाच वाजताच अंधार्‍या मार्गाने मार्गस्थ व्हायला लागते तेव्हा कोठे ती आठचे काॅलेज अडेंट करु शकते.ती मुळात हुशार आहे.बारावीपर्यंत तीने चांगल्या मार्कांनी यश मिळवले आहे.तीला अनेक बक्षिसेही मिळालेली आहेत.शिक्षणासाठी तीची मेहनत करायची तयारी आहे.काॅलेजला जाताना अडीच तास व परत येताना अडीच तास चालुन ती ध्येयाकडे वाटचाल करत आहे.तीचा भाउही आता दहावीला आहे.तोही हे असच अंतर पार करत असतो.

हेही वाचा -शहरात खळबळ ; कागलमध्ये सापडला कोरोना पॉझिटिव्ह ;  कागल होते शंभर दिवस कोरोनापासून दूर -

 दररोज एवढे अंतर  कापुन अभ्यास संभाळुन रंजना घरी स्वयंपाकालाही मदत करत असते,गुराढोरांचे काम पहात असते हे विशेष.मुळ रस्त्यापर्यंत येण्यासाठी थोडी डोंगरवाटही तीला कापावी लागते.हे असे बारमाही सुरु असते.सध्या महाविद्यालये बंद असल्याने तीला चालत जाण्यापासुन थोडा आराम आहे.अजुन तीन वर्ष पदवी मिळेपर्यंत तीला अशीच अडीच तासांची पायपीट करावी लागणार आहे. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranjana Kolapate story in sadvli ratnagiri