ड्रोसेरा बर्मानी ही दक्षिण कोकणात नदीच्या पात्राच्या बाजूस व भातशेतात पावसाळ्यानंतर सापडते. ही एक लुप्तप्राय मांसाहारी वनस्पती असून या वनस्पतीचा उपयोग हर्बल औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
दोडामार्ग : केर गावात कीटकभक्षी असणाऱ्या वनस्पतींच्या दुर्मीळ प्रजातीतील ‘ड्रोसेरा बर्मानी’ (Drosera Burmannii) ही कीटकभक्षी (मांसाहारी) वनस्पती आढळली आहे. त्यामुळे येथील जैवविविधता वैभव परत एकदा अधोरेखित झाले आहे. येथील निसर्ग अभ्यासक तुषार देसाई हे वनश्री फाउंडेशन सिंधुदुर्ग संस्थेमार्फत (Vanashree Foundation Sindhudurg Institute) आयोजित पक्षी निरीक्षणासाठी फिरत असताना ही दुर्मीळ वनस्पती त्यांना आढळली.