कोलझर : ‘हंप नोस्ड पिट वायपर’ अर्थात नाकाड्या साप या अत्यंत विषारी असलेल्या दुर्मीळ सापाचे येथे दर्शन झाले आहे. महाराष्ट्रातली हा साप मिळण्याची ही दुसरी नोंद आहे. याआधी तिलारी खोऱ्यात ही प्रजाती आढळली होती. स्थानिक तरुणांना येथील शिडप भागात हा साप आढळला. नाकाड्या साप अत्यंत विषारी असला तरी तो फार कमी प्रमाणात आढळतो. दक्षिण भारतात पश्चिम घाटाच्या कमी ते मध्यम उंचीच्या प्रदेशात त्याचा अधिवास आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेपासून ते केरळ आणि तामिळनाडूपर्यंत तो आढळतो. श्रीलंकेतही त्याची नोंद झाली आहे.