शेतकऱ्यांना मिळणार आता बोनस ; दरातही होणार वाढ

the rate of rice increased in ratnagiri rupees 2568 rate done in ratnagiri
the rate of rice increased in ratnagiri rupees 2568 rate done in ratnagiri

सिंधुदुर्गनगरी : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या भाताला शासनाने निश्‍चित केलेल्या प्रति क्विंटल १८६८ रुपये दरामध्ये आणखी ७०० रुपये बोनस दिला आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २५६८ रुपये दर मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी खासगी विक्रेत्यांकडे भात विकू नये, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे चेअरमन सतीश सावंत यांनी केले आहे.

भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिक्विंटल १८६८ रुपये हा दर दिला होता. त्यामध्ये ७०० रुपये बोनसची वाढ केली आहे. आता हा दर २५६८ रुपये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५३ रुपयाने दरात वाढ झालेली आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र शासनाने दिलेला दर अधिक आहे. जिल्ह्यातील भात उत्पादकांना चांगला दर राज्य शासनाने दिला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक या सर्वांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे भाताला चागला दर मिळाला आहे.

जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी भाताची खाजगी विक्री करू नये तर जिल्ह्यातील अधिकृत खरेदी - विक्री संघात भाताची विक्री करावी. जिल्ह्यात ४२ ठिकाणी भात खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. याठिकाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भात विक्री करावी, यासाठी २ लाख बारदाने (पिशव्या) मागविल्या असून आतापर्यंत २० हजार बारदाने उपलब्ध झाली आहेत.

येत्या आठवड्याभरात आणखी ४० हजार बारदाने उपलब्ध होतील. त्यांचा कोठेही तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेतली आहे. गतवर्षी ३६ क्विंटल भात खरेदी झाली होती. यावर्षी ती ७५ क्विंटलहुन अधिक भात खरेदी होईल. या दृष्टीने प्रयत्न असल्याची माहिती जिल्हा बॅंक अध्यक्ष सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com