esakal | रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

Ratmagiri Krhade Bramhan Sangh Declears Awards

संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले. खानू येथील निवृत्त सैनिक आणि मुक्त पत्रकार अरुण आठल्ये यांनी 1971 च्या भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सरपंचपदही भूषवले असून पत्रकार म्हणून विविध विषयांवर लेखन करतात.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या पुरस्कारांची घोषणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने 2020 सालचे विविध पुरस्कार आज जाहीर केले. पुरस्कारमूर्तींमध्ये माजी सैनिक तथा पत्रकार अरुण आठल्ये यांना दर्पण पुरस्कार, डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना धन्वंतरी पुरस्कार, अनंत कर्वे यांना आदर्श कीर्तनकार पुरस्कार, विनायक वाकणकर उद्योजक पुरस्कार, सुयोग पाध्ये यांना आदर्श पौरोहित्य पुरस्कार व अनघा प्रभुदेसाई यांना आचार्य नारळकर आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. 

संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी हे पुरस्कार जाहीर केले. खानू येथील निवृत्त सैनिक आणि मुक्त पत्रकार अरुण आठल्ये यांनी 1971 च्या भारत-पाक युद्धात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सरपंचपदही भूषवले असून पत्रकार म्हणून विविध विषयांवर लेखन करतात. 1972 पासून राजापूरात वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. बाळकृष्ण पाध्ये यांना यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक, राजापूर नगर वाचनालय, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ आदी संस्थांमध्ये मोठ्या पदांवर त्यांनी काम केले आहे.

कीर्तनभास्कर अनंत तथा नंदकुमार कर्वे हे संगीत विशारद (हार्मोनियम), संगीत अलंकार असून संगीत शिक्षक म्हणून सेवा दिली आहे. 1984 पासून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, गोवा आणि कर्नाटक राज्यात त्यांनी कीर्तने केली आहेत. ससाळे (राजापूर) येथील अनघा प्रभुदेसाई यांना शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे. 1986 पासून त्यांनी पाचेरी सडा (गुहागर), बारसू, आंगले, पांगरे बुद्रुक (राजापूर) या शाळांमध्ये त्यांनी शिकवले आहे. 

सुयोग पाध्ये, विनायक वाकणकर यांचा सन्मान 
आदर्श पौरोहित्य पुरस्कार सुयोग पाध्ये यांना जाहीर झाला. पाध्ये यांनी राजापूर संस्कृत पाठशाळा ज्येष्ठ वेदमूर्तींकडून याज्ञिक मार्गदर्शन घेतले आहे. विशेष यज्ञांचे प्रतिनिधीत्व केले आहे. तसेच उद्योजक पुरस्कार विनायक वाकणकर यांना दिला जाणार आहे. ते विविध प्रकारची सरबतं, लोणची, आमरस पॅकिंग चकली-कडबोळी उत्पादन यांचा सुमारे 30 वर्षे व्यवसाय करत आहेत. 
 

संपादन - राजेंद्र घोरपडे