सामंतांना भेटलेले 20 नगरसेवक शिवसेनेतच, शिवसैनिक सेनेशी प्रामाणिक

रत्नागिरीतील २० नगरसेवक उदय सामंत यांना भेटले असतील, मात्र ते अजूनही शिवसेनेशी प्रामाणिक आहेत
uday samant
uday samant esakal
Summary

रत्नागिरीतील २० नगरसेवक उदय सामंत यांना भेटले असतील, मात्र ते अजूनही शिवसेनेशी प्रामाणिक आहेत

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. सेना तळागाळात रुजली असून ती आहे तिथे आहे. रत्नागिरीतील २० नगरसेवक उदय सामंत यांना भेटले असतील, मात्र ते अजूनही शिवसेनेशी प्रामाणिक आहेत, असा दावा शिवसेनेचे उपनेते आणि आमदार राजन साळवी यांनी खासगी दूरचित्रवाहिशी बोलताना केला. मात्र पक्षांतर्गत हकालपट्टी आणि नियुक्त्या आणि रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाबाबत मौन पाळले.

राज्याच्या शिवसेनेला पक्षांतर्गत खिंडार पडल्यानंतर जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार योगेश कदम आणि उदय सामंत हे एकनाथ शिंदे गटात गेले. सामंत यांना समर्थन देणाऱ्या युवा नेत्यांना हटवले. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी दौरा केला तेव्हा उपजिल्हा प्रमुख, शहरप्रमुखांनी त्यांची भेट घेतली. त्याची माहिती मातोश्रीवर गेल्यानतंर दुसऱ्या दिवशीच सामंत गटातील पदाधिकऱ्यांची उचलबांगडी केली. त्याच्या जागी मुळ सेनेतेल पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

uday samant
ओबीसींचे राज्यात राजकीय आरक्षण कायम राहिल्याचा अधिक आनंद : छगन भुजबळ

सामंत गटाने सेनेला झटका देत, काही तासात राजीनामा दिला. त्यानंतर सेनेच्या २३ पैकी २० नगरसेवकांनी उदय सामंत यांना समर्थन दिले. सामंत रत्नागिरी दौऱ्यावर आले तेव्हा, २० नगरसेवकांनी त्यांची भेट घेऊन समर्थन दर्शवले. यावर ते म्हणाले, उदय सामंत नेते आहेत. अनेक वर्षे ते राजकारणात आहेत. ते आल्यानंतर त्यांना नगरसेवक भेटायला गेले याचा अर्थ ते त्याच्याबरोबर गेले असे नाही. ते २० नगरसेवक आजही सेनेशी प्रामाणिक आहेत, सेनेबरोबर आहेत.

शहर आणि जिल्हा कार्यकारिणीवरील काही पदाधिकाऱ्यांना काढुन टाकण्यात आले. नवीन नियुक्त्या केल्या, या प्रश्नावर ते म्हणाले, मला याबाबत माहित नाही. सेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंवर आणि त्याच्या बाजूला असणाऱ्यांवर टीका झाली. यावर साळवी म्हणाले, रामदास कदम यांच्यावर बोलण्याएवढा मी मोठा नाही, आमचे वरिष्ठ त्याला उत्तर देतील.

जिल्ह्यातील राजकीय घडामोडीचा कोणताही परिणाम सेनेवर होणार नाही. कोण कुठे गेले तरी सेना आहे तिथेच राहणार. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयाने पुढची तारीख दिली असली तरी आमचा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाजूनेच हा निकाल लागेल असेही त्यानी सांगितले.

uday samant
President Election Result Live: मतमोजणीला सुरूवात; मुर्मूंच्या गावात जल्लोष

उदय सामंत मला भावासारखे : बंड्या साळवी

शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, उदय सामंत हे मला भावासारखे आहेत. त्यांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले आहे. कोण कुठे, गेले तरी शिवसेना आहे तिथेच आहे. यापूर्वी सेनेचा आमदार किंवा खासदार नसतानाही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिका सेनेकडेच होत्या. यापुढेही तालुक्यासह जिल्ह्यात हेच चित्र असेल.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com