Ratnagiri : आरोग्य विभागास २७ रुग्णवाहिका

जिल्हा परिषदेच्या ५७ आरोग्य केंद्रांची गरज पूर्ण; विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नांना यश
ratnagiri
ratnagirisakal
Updated on

रत्नागिरी : जिल्हा परिषद आरोग्य विभागाला नव्याने २७ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या असून, आणखी चार रुग्णवाहिका येत्या काही दिवसांत मिळणार आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सक्षम होणार असून रुग्णवाहिकेअभावी दुर्गम भागात रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी दिली. ६७ आरोग्य केंद्रांपैकी ५७ ठिकाणी या नवीन रुग्णवाहिका कार्यरत होत आहेत.

कोरोना कालावधीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. त्या वेळी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी रुग्णवाहिका मिळाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. खनिकर्म विभागाकडील जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या निधीमधून आणि आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार ऐन कोरोना कालावधीमध्ये २६ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे चार रुग्णवाहिका काही वर्षांपूर्वी घेतल्या होत्या. जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र असून प्रत्येकी एक रुग्णवाहिका उपलब्ध होती. त्या चालवणेही अशक्य असल्यामुळे निकषानुसार, ४७ रुग्णवाहिका निर्लेखित करण्यात आल्या; मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्याचा वापर सुरूच ठेवण्यात आला होता. कोरोनातील परिस्थितीमुळे जूनमध्ये नवीन रुग्णवाहिकांसाठी प्रयत्न सुरू झाले.

पहिल्या टप्प्यात आलेल्या रुग्णवाहिका गरज असलेल्या आरोग्य केंद्रांकडे देण्यात आला. दुसऱ्‍या टप्प्यात ३१ रुग्णवाहिका राज्य शासनाकडून मंजूर झाल्या. त्यातील २७ रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे दाखल झाल्या आहेत. अजुन चार रुग्णवाहिका येणार आहेत. एकूण ६७ आरोग्य केंद्रांपैकी ५७ ठिकाणी या नवीन रुग्णवाहिका कार्यरत होत आहेत, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mumbai-Goa Highway Traffic Crisis in Chiplun:
Eco-Friendly Ganeshotsav
Pugaon Maharashtra hazardous chemical leakage news
Mumbai-Konkan Ro-Ro Service
Marathi News Esakal
www.esakal.com