esakal | Ratnagiri : ५९ नवीन बाधित, ७० जणांची मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Ratnagiri : ५९ नवीन बाधित, ७० जणांची मात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात आज एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसला तरी २४ तासांमध्ये ५९ नवीन बाधित रुग्ण सापडले आहेत, तर ७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९६.०२ टक्के झाले आहे. तर मृत्यूदर कायम आहे. जिल्ह्यात आज चाचण्यांचे प्रमाण अगधी कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गेल्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात १ हजार ६१८ कोरोना चाचण्या झाल्या. त्यामध्ये ५९ जण बाधित सापडले आहेत. १ हजार ५५९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे.

आतार्यंत निगेटिव्ह स्वॅबची संख्या ७ लाख ६१ हजार ०६ एवढी आहे. जिल्ह्यात दिवसभरात ७० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७५ हजार ०११ आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९६.०२ टक्के आहे. अनेक दिवसानंतर दिलादायक म्हणजे जिल्ह्यात एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही. आजवर झालेल्या एकूण मृतांची संख्या २ हजार ४२६ असून मृत्यूदर ३.११ टक्के आहे. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६८६ आहे. त्यामध्ये गृहविलगीकरणामध्ये ३७० तर संस्थात्मक विलगीकरणामध्ये ३१६ जणांचा समावेश आहे.

कोरोनाची स्थिती

  1. जिल्ह्यात कोरोना चाचण्या - 1618

  2. अहवाल निगेटिव्ह - 1559

  3. एकूण मृतांची संख्या - 2426

  4. जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण - 686

loading image
go to top